जिल्हा रुग्णालयात मद्यपीचा धिंगाणा

By admin | Published: February 20, 2016 11:11 PM2016-02-20T23:11:12+5:302016-02-20T23:12:33+5:30

अदखलपात्र गुन्हा : वॉर्डबॉयला मारहाण

Drinking liquor in the District Hospital | जिल्हा रुग्णालयात मद्यपीचा धिंगाणा

जिल्हा रुग्णालयात मद्यपीचा धिंगाणा

Next

 नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील आॅपरेशन थिएटरमध्ये शनिवारी (दि. २०) दुपारच्या सुमारास एका मद्यपीने गोंधळ घातला़ डॉक्टरांचे आॅपरेशनचे साहित्य घेऊन मद्यपी त्यांच्या अंगावर धाऊन जात असल्यामुळे कर्मचारी चांगलेच घाबरले होते़ या गोंधळाची माहिती जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांना मिळताच त्यांनी या मद्यपीस ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले़
जिल्हा रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर व नर्स हे नेहमीप्रमाणे आॅपरेशन करीत होते़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोरक्षनाथ निवृत्ती काळे (रा़ मिठसागरे, ता़ सिन्नर) या मद्यपीने आॅपरेशन थिएटरबाहेरचा लोखंडी दरवाजा जोरात ढकलून थेट आॅपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला़ त्यास तेथील डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉयने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्या अंगावर धावून गेला़ तसेच येथील वॉर्डबॉयला मारहाण करू लागल्याने गोंधळ निर्माण झाला होता़
यासंदर्भात एका नर्सने रुग्णालयातील पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार बी़ ए़ शिंदे हे तेथे पोहोचले़ त्यांनी गोंधळ घालणारा मद्यपी गोरक्षनाथ काळे यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मद्यपी काळे याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यास आला आहे़

Web Title: Drinking liquor in the District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.