मालेगावी ९० लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:28 AM2019-10-18T01:28:25+5:302019-10-18T01:29:22+5:30
महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला.
मालेगाव : महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला.
मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने शिवारातील एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून हा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, अशोक तारू, कर्मचारी सदा जाधव, सुरेश सेगर, राहुल पवार यांना केवळ हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा महाराष्टÑात विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गेल्या दोन दिवसांपासून मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहनांसह हॉटेल परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. सायने शिवारातील एका हॉटेलवर ट्रक (क्र. डीएल ०१ जेजे ५५००) हा संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. वाहनचालकाची कसून चौकशी केल्यानंतर वाहनात संरक्षण विभागाचे साबन, शॅम्पू व इतर घरगुती साहित्य असल्याची बिल्टी दाखवली. भरारी पथकाने वाहनाची झडती घेतली असता ट्रकमध्ये प्लॅस्टिक कागदांमध्ये ९६० बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.