जुन्या मध्यवर्ती बसस्थानकात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:06 AM2018-12-26T00:06:44+5:302018-12-26T00:22:43+5:30
लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटतर्फे येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आरओ फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटतर्फे येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आरओ फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळणार असल्याने सीबीएस स्थानकावर बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा प्राप्त झाली आहे. या प्रकल्पासाठी लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटला हर्ष कन्स्ट्रक्शन्स आणि आनंद अॅग्रो यांचे सहकार्य लाभले आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव जयम व्यास, खजिनदार डी. एस. पिंगळे, विलास पाटील, विलास बिरारी, उद्धव अहिरे, सुनील लोहारकर, शेखर सोनवणे, रवींद्र दुसाने, नाशिक आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे आदी उपस्थित होते.
लायन्स क्लबतर्फे शहरात विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे पाण्याचे एटीएम बसविण्यात येणार आहेत. जुने बसस्थानक परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण, सटाणा, नंदुरबार आदी ठिकाणी प्रवास करणाºया प्रवाशांची सुविधा झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे चलन वाचणार आहे.
पाण्याबाबत उद्घोषणा
जुने बसस्थानकावर राज्य परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापकांनी लायन्स क्लबचे आभार मानले असून, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पाण्याची सुविधा आहे, अशी उद्घोषणा करण्यात येऊन प्रवाशास या सुविधेचा लाभ घेता येईल. स्थानकावर विविध ठिकाणी पाण्याच्या एटीएमकडे येण्यासाठी दिशादर्शक लावण्यात येतील, असे आश्वासन राज्य परिवहन मंडळ नाशिक आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे यांनी यावेळी बोलताना दिले.