घोरवड परिसरात तरूणांकडून मोरांसाठी पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:42 PM2019-05-05T18:42:16+5:302019-05-05T18:43:07+5:30
पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. घोरवडला तरूणांनी स्वखर्चाने व श्रमदानातून पाणवठे निर्माण करून अन्न व पाण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे.
सिन्नर : पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. घोरवडला तरूणांनी स्वखर्चाने व श्रमदानातून पाणवठे निर्माण करून अन्न व पाण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे. घोरवडला शेतकरी कुटुंबातील तरूणांनी एकत्र येत कृत्रिम पाणवठे निर्माण करून पक्ष्यांना दिलासा दिला आहे. स्थानिक तरूणांनी स्वखर्चातून मोरांसाठी अन्न-पाण्याची सोय केली आहे.
४ मुक्या प्राण्यांसाठी येथील तरूण व बळीराजाने पुढाकार घेतला आहे. घोरवड शिवारात मोठ्या प्रमाणात मोरांचे वास्तव आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने घोरवडच्या तरूणांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमात युवा शेतकरी विनय हगवणे, संदीप ताजणे, श्याम हगवणे, विकास हगवणे, बाळासाहेब भुजबळ, केशव हगवणे, समाधान हगवणे, हरीश हगवणे यांनी पाण्याचे हौद बनविले असून, परिसरात मोरांची पिण्याच्या पाण्याची सोय या माध्यमातून करण्यात आली आहे.