पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:00 PM2018-07-12T23:00:39+5:302018-07-13T00:26:50+5:30

पेठ : संपूर्ण तालुक्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पेठ येथील ग्रामीण रुग्णालयाला समस्यांनी वेढा घातला असून, करोडो रुपयांचे अनुदान खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे रुग्णांना पाण्यात उभे राहून उपचार घेण्याची वेळ आली आहे.

 Drinking Water in Rural village level of Peth | पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात पाणीच पाणी

पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात पाणीच पाणी

Next

पेठ : संपूर्ण तालुक्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पेठ येथील ग्रामीण रुग्णालयाला समस्यांनी वेढा घातला असून, करोडो रुपयांचे अनुदान खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे रुग्णांना पाण्यात उभे राहून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
पेठ शहरासह तालुक्यात सध्या संततधार पावसाने सुरुवात केली असून, त्यामुळे विविध साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खासगी वैद्यकीय उपचाराची सुविधा नसल्याने जनतेला सरकारी रुग्णालयाच्या उपचारावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाने तत्काळ सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विशाल जाधव, तालुकाध्यक्ष युवराज भोये आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

रु ग्णसेवेसाठी पेठ शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी इमारत बांधण्यात आली असली तरी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागाच्या छतावर कोणत्याही प्रकारचे झाकण नसल्याने पावसाचे पाणी थेट तपासणी कक्षात येते. याच ठिकाणी रुग्ण केसपेपर घेण्यासाठी व उपचार करून घेण्यासाठी रांगा लावून असतात.

Web Title:  Drinking Water in Rural village level of Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस