ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:07 PM2020-02-07T18:07:18+5:302020-02-07T18:07:33+5:30
सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.
सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.
युवा मित्र संस्था व सिजेंटा इंडिया लि. च्या सहकार्याने सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबकवरील कांदा लागवड-खत आणि किड व रोग व्यस्थापन तसेच कृषी विभागाच्या योजनांचा मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी कार्यक्र म सरदवाडी येथील उत्तम शिरसाठ यांच्या कांदा क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
युवा मित्र संस्था २५ वर्शांपासून पाणी व्यवस्थापन, महिला उपजिविका, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अजित भोर, दिनेश ठोंबरे, सुधीर मोराडे उपस्थित होते.
मोराडे यांनी युवा मित्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. सिन्नर तालुक्यातील सततचा कमी पडणारा पाऊस व उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे वापर करणे, ठिबक सिंचन खालील क्षेत्र वाढविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने १५ गावांध्ये २५० शेतकऱ्यांसोबत २५० एकरावर हा प्रकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.