वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:04+5:302021-09-23T04:17:04+5:30
कोट.. मोकाट जनावरे पकडण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. तसेच संबंधित जनावर मालकांकडून दंड ...
कोट..
मोकाट जनावरे पकडण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. तसेच संबंधित जनावर मालकांकडून दंड घेतला जातो. गेल्या १४ महिन्यांत साडेसहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
इन्फो...
मोकाट जनावरांचा वाली काेण?
नाशिक शहरात अनेक भागात गोठेधारक आहेत. त्यांच्याकडे गायी म्हशी देखील आहेत. मात्र, काही भागात मालकच जनावरांना मुक्त संचार करू देतात आणि सायंकाळी जनावरे बरोबर घरी येतात. किंवा आणली जातात.
इन्फो...
या मार्गांवर वाहने जपून चालवा
-रामकुंड परिसर
-पवननगर, सिडको
- सारडा सर्कल
- सातपूर गावातील बाजार
- दत्त मंदिर, नाशिक रोड
इन्फो...
वर्षभरात आठशे जनावरे जप्त
नाशिक महापालिकेच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराने चौदा महिन्यांत आठशे जनावरे पकडली. त्यातील अडीचशे जनावरांच्या मालकांकडून साडसहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर उर्वरित जनावरे गो शाळेला देण्यात आली आहे. महापालिकेचा पंचवटीत कोंडवाडा असून तेथे ही जनावरे ठेवण्यात येतात.
220921\22nsk_10_22092021_13.jpg
सारडा सर्कल हे मेाकाट जनावरांचे ठिय्या देण्याचे हक्काचे ठिकाण. दररोज सकाळपासून येऊन बसलेल्या या जनावारांमुळे वाहनचालकांना मात्र जीव वाचवून वाहन चालवावे लागते.