देवळा बसस्थानकाला वाहनांचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 08:15 PM2018-08-05T20:15:05+5:302018-08-05T20:15:17+5:30

देवळा : येथील बसस्थानकावर परिवहन महामंडळाने चार महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्याने रोडरोमिओंसह सोनसाखळी चोरांना आळा बसल्यामुळे प्रवाशी, व विद्यार्थीनींनी समाधान व्यक्त होत आहे. मात्र रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत परिवहन विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Drive the vehicles to Devla bus station! | देवळा बसस्थानकाला वाहनांचा विळखा!

देवळा बसस्थानकाला वाहनांचा विळखा!

googlenewsNext

देवळा बसस्थानकाची रचना चांगल्या पध्दतीने झाली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खड्डेमुक्त बसस्थानक अशी पूर्वीपासून ख्याती आहे. विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात नाशिक, नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणे, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगाराच्या ४५० बसेसची ये -जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच पोलिसांनी देखील कारवाई सुरू केल्यामुळे बसस्थानकावर खिसेकापू व सोनसाखळी चोरांवर आळा बसला आहे. मुलींची छेड काढणाऱ्या तसेच धूम स्टाईलने दुचाकी चालवणाºया रोडरोमिओंनादेखील आळा बसला आहे. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेक जण दुचाकीने येतात. शहरात पार्कींगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानकाच्या आवारात उभ्या करतात. यामुळे बसस्थानक दुचाकींनी भरून जाते. त्यातच खासगी वाहने देखील बिनदिक्कतपणे बसस्थानकात ये जा करतात. यामुळे बसस्थानकात बसेसला अडथळे निर्माण होतात. याबाबत परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
इन्फो...
स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या देवळा नगरपंचायतीने शहराचे होत असलेले विस्तारीकरण व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्कींगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
 

 

 

Web Title: Drive the vehicles to Devla bus station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.