नाशिकचे चालक, वाहक मुंबईत बजावणार सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:44 PM2020-04-06T22:44:39+5:302020-04-06T22:46:14+5:30
नाशिक : कोरोनाशी दोन हात करत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांची लोकडाउन काळात प्रवासाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘लालपरी’ व तिचे कर्मचारी सज्ज झाले आहेत. वाहतुकीची सोय म्हणून आरोग्य कर्मचाºयांसह पोलिसांकरिता एसटी रस्त्यावर उतरली असून, मुंबईत एसटीच्या संख्येत आता विभागाकडून वाढ केली जाणार आहे. त्यासाठी नाशिक, रायगड आजाराचे प्रत्येकी ३० चालक-वाहक मुंबईत रवाना झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक महाराष्ट्रात वाढत आहे. विशेषत: मुंबई आणि लगतच्या परिसरात कोरोना व्हायरसचे लोण पसरले आहे. दररोज कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविण्याºया यंत्रणेवर ताण पडत आहे. या सेवेतील कर्मचाºयांची संख्या मोठी असल्याने त्यांची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे. एसटी प्रशासनाच्या मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. या सेवेत वाढ करण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगड विभागातील प्रत्येकी १५ चालक व प्रत्येकी १५ वाहक असे ३० कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले आहे. हे कर्मचारी ठाणे विभागात पुढील काही दिवस सेवा देणार आहेत. दोन्ही विभागातील निवडक कर्मचारी गुरुवारी (दि.२) विशेष बसने ठाण्यात पोहचले आहेत.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी जाणाºया चालक-वाहकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळाकडून केली जाणार आहे. नाशिक विभागातील कर्मचारी ठाणे आगार एक तर रायगड विभागातील कर्मचारी ठाणे आगार दोन येथे कर्तव्याला राहणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी सांगितले.