देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:47 PM2019-07-26T12:47:25+5:302019-07-26T12:47:42+5:30

इगतपुरी : गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

The driver of the Devgiri Express noticed that the rash on the doorstep was avoided. | देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

कसारा घाटात रेल्वे रु ळावर दरड कोसळल्याने उभी असलेली देवगिरी एक्सप्रेस. 

Next
ठळक मुद्देकसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.



लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी :
गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या बाबत माहीती अशी की दोन दिवसांपासुन घाटात जोरदार व संततधार पाऊस सुरु आहे. या पडणाऱ्या पावसामुळे दि.२६ रोजी पाच वाजेच्या सुमारास कसारा घाटातील मुंबईच्या दिशेने जाणºया तीन नंबर बोगद्याच्या जवळपास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी सव्वा पाच वाजता याच रु ळावरून मुंबईच्या दिशेने ट्रेन नंबर १७०५८ देवगिरीएक्सप्रेस जात होती. घाटात धुके असुनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताचं त्यांनी तातडीने गाडी थांबविली.यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहीती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे आधिकारी एस. एस. बर्वे, रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्य यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी आणि रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रु ळावर पडलेली दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुर केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी दवेगिरी एक्सप्रेस सुमारे दिड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रु ळावरील दरड काढल्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतुक सुरळीत केली. मुंंबईला
जाणारी व मुंबईहुन येणारी वाहतुक सुरळीत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली.
या एकाच महीन्यात पावसामुळे रेल्वे मार्गावर पंधरा दिवसापुर्वी घाटातील बोगद्या बाहेर दरड कोसळ्ली होती. तर आठवड्यापुर्वी अंत्योदय एक्सप्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर एक डबा रु ळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर देखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळले होते.
 

Web Title: The driver of the Devgiri Express noticed that the rash on the doorstep was avoided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.