झाडावर कार आदळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:09 AM2018-05-29T01:09:23+5:302018-05-29T01:09:23+5:30
अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास एमएच १५ ईपी १९२६ या होंडा अमेंझ कारमधून काही मित्र अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने जात असताना चालक गिरीश दीपक भरीतकर (२२) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार जोरात आदळली. कारचा वेग इतका होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात रामेश्वर जाधव (१६), नीलेश बडगुजर (२५) व इतर दोघे असे पाच जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण कारमधून येत असताना भरीतकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकजवळील रस्त्यावरील झाडावर कार आदळली. यामध्ये भरीतकर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.