ट्रक चालकावर चाकूहल्ला, दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 03:28 PM2019-10-22T15:28:57+5:302019-10-22T15:29:10+5:30
शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.
शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले. महामार्ग पोलीस कर्मचारी जाधव ,श्रीराम वरूंगसे, संतोष माळोदे, संतोष गांगुर्डे व पोलीस निरीक्षक वालझाडे व त्यांचे सहकारी हे आपला हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास गस्त करण्यासाठी उभी असताना त्यांना हाणामाऱ्या झाल्याचा आवाज आल्याने त्यांनी प्रसंगसावधान ओळखून घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळावरून सदर हल्लेखोर पसार होण्यास यशस्वी झाले. यावेळी महामार्ग पोलीस ठाणे अंमलदार यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली असता त्यांना त्यावेळी पोलिस चौकीजवळून दोन तरूण जाताना आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यात दोन
तरु णांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरु करत असताना काही अंतराच्या आतच या दोन तरु णांना पकडण्यात आले, त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणलेले असता त्यांनी आपल्या सर्व गुन्हयाची कबुली दिली. यात संतोष जाधव येल्यची पेठ तालुका त्रंबक जिल्हा नाशिक, गोटीराम दामू आचारी पेठ तालुका त्रंबक, दीपक जाधव तळेगाव तालुका इगतपुरी, किरण येले, येल्याची पेठ तालुका त्रंबक जिल्हा नाशिक आदींवर हायवे रॉबरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इगतपुरीचे खोंडे पुढील तपास करत आहे.