अज्ञात वाहनाच्या धडकेत चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:44 PM2018-06-17T23:44:08+5:302018-06-17T23:44:08+5:30
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डोक्यास गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या छोटा हत्ती या चारचाकी वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) घडली़ कैलास संपतराव हेरिंगे (वय ४५, रा़ हरिमात सोसायटी, शनिमंदिरसमोर, सायट्रिक इंडिया, जेलरोड) असे आहे़
नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डोक्यास गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या छोटा हत्ती या चारचाकी वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) घडली़ कैलास संपतराव हेरिंगे (वय ४५, रा़ हरिमात सोसायटी, शनिमंदिरसमोर, सायट्रिक इंडिया, जेलरोड) असे आहे़ इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छोटा हत्ती चारचाकीचालक कैलास हेरिंगे हे बुधवारी (दि़१३) पहाटे ४ वाजेच्या सुमारास गाडी घेऊन पाथर्डी फाटा परिसरातून जात होते़ पाथर्डी रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांच्या डोक्यास मुका मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
नाशिकरोडला विवाहितेचा छळ
सुरुवातीला मूलबाळ होत नाही, काम करता येत नाही या कारणावरून तर मुलगा झाल्यानंतर माहेरून पैसे आणत नाही म्हणून या कारणावरून पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची फिर्याद नांदूर गावातील विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़ नाशिकरोड पोलीस ठाण्यात अश्विनी रवींद्र मोरे (वय २०, रा़ महारुद्रनगर नांदूरगाव) या विविहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती रवींद्र श्रीधर मोरे हा विवाहानंतर काम येत नाही तसेच मूलबाळ होत नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण करीत असे़ यानंतर गर्भवती असताना काळजी न घेता तसेच मुलगा झाल्यानंतर नांदण्यास नेण्यास नकार दिला़ यानंतर काही दिवसांनी पुन्हानांदण्यास घेऊन गेला व माहेरून घरखर्चासाठी पैसे आणण्यास सांगितले़ यास विवाहिता अश्विनी मोरे हिने नकार दिला असता तिला जबर मारहाण करून घरातून हुसकून दिले़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पती रवींद्र मोरे विरोधात विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
गंगापूररोडवरून दुचाकीची चोरी
पंचवटीतील मधुबन कॉलनीतील रहिवासी संतोष शिंदे यांची २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगांची पल्सर दुचाकी (एमएच १५, सीयू ७८९९) चोरट्यांनी गंगापूररोडवरील रिप्लेक्शन जीमसमोरून शुक्रवारी (दि़१५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
रेशन दुकानातून विक्री करण्यात येणाºया निळ्या रॉकेलमध्ये केमिकल व पावडर मिक्स करून त्याचे पांढºया रंगामध्ये रूपांतर करून अनधिकृतपणे विक्री करणाºया दोघांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
४संशयित संतोष लक्ष्मण क्षीरसागर (३६, रा़ दत्तनगर, पेठरोड) व दिनेश हिरालाल पटेल (नाव व पत्ता माहिती नाही) हे शनिवारी (दि़१६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील तवली फाट्यावरील जाधव यांच्या घरात निळे रॉकेल केमिकल व पावडर टाकून सफेद बनवून त्याची विक्री करीत होते़ त्यांच्याकडून ३ हजार ४०० रुपये किमतीचे ८५ लिटर निळ्या रंगाचे रॉकेल, रॉकेलचे कॅन, १० लिटर पांढरे रॉकेल, १० लिटर अॅसिड भरलेली कॅन व आयएनपओएस नावाची बॅग असा पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ या रॉकेल भेसळ प्रकरणी पोलीस नाईक गणेश रेहरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़