चालकदिनी होणार चालकांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:38+5:302021-09-17T04:18:38+5:30
नाशिक : रात्रंदिवस वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चालकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून चालक व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी ...
नाशिक : रात्रंदिवस वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चालकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून चालक व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी दि.१७ सप्टेंबरला चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने व नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यातून चालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोणार्क नगरच्या लक्ष्मी नारायण लॉन्स येथे २०० चालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २५ वर्ष अपघात विरहीत सेवा देणाऱ्या २५ चालकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम सैनी यांनी दिली आहे. देशात १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन संजू राठी व सहचेअरमन महेंद्रसिंग राजपूत हे करत आहे, अशी माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.