चालकाच्या शॉटकटमुळे प्रवाश्यांवर ओढवले संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:53 PM2019-09-30T17:53:51+5:302019-09-30T17:57:23+5:30

पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे महामंडळातील कर्मचारी किती बेजबाबदार असतात हे समजते.

 Driver's shortcut puts passengers at risk | चालकाच्या शॉटकटमुळे प्रवाश्यांवर ओढवले संकट

चालकाच्या शॉटकटमुळे प्रवाश्यांवर ओढवले संकट

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : बस सरकली मात्र जमावाने धाव घेतल्याने टळला अनर्थ

पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे महामंडळातील कर्मचारी किती बेजबाबदार असतात हे समजते.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी केल्याने शेतकऱ्यांनी चिंचखेड चौफुलीवरील राष्टÑीय महामार्गावर रास्ता रोको करत ठिय्या केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहनचालकांमध्ये गर्दीतून गाडी काढण्यासाठी मोठी कसरत सुरू झाली.
नाशिकहुन मालेगावला जाणाºया (एम एच १४ बी.टी २६१७) या गाडीतील चालकाने महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने गाडी डावा पालखेड कालव्याच्या कडेने अरुंद पायवाट असलेल्या ठिकाणाहून बस उतरविण्याचा प्रयत्न केला परंतु ‘अति घाई संकटात नेई’या म्हणी प्रमाणे घाईघाईने बस गर्दीच्या ठिकाणाहून काढतांना बस सरकली व एकच खळबळ उडाल्याने प्रवाश्यांमध्ये आरडा-ओरडा सुरू झाला.
जमावाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरले व प्रवाशांच्या आणि जमवाच्या मदतीने समोरून बसला धक्का देत बसला सुखरूप रस्त्यावर काढुन प्रवाशांनी चालकाला मात्र चांगलाच शाब्दिक मारा केला. या घडनेमुळे प्रवाश्यांनी महामंडळाच्या या बेजबाबरदार कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
रस्ता पूर्ण पणे बंद असतांना देखील बस चालकाने प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून डाव्या कालव्या वरून बस पायवाट असलेल्या अरुंद ठिकाणाहून उतरविण्याचा प्रयत्न केला. प्रवासी व वाहक चालकांना ओरडत होते, तरी चालकाने कुणाचेच ऐकले नाही. परिणामी बस सरकली वेळेत प्रवाशी खाली उतरलामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही बसवरील चालक प्रवाशांचा विचार करत नाही. ही मोठी शोकांतिका आहे.
- कारभारी पवार, प्रवासी.

 

Web Title:  Driver's shortcut puts passengers at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.