एका वाहनचालकाचा यू-टर्न; एक आढळला बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:02+5:302020-12-14T04:30:02+5:30

नाशिक : पेठनजीकच्या राज्य तपासणी नाक्यावर दुपारनंतर कसून तपासणीला प्रारंभ करण्यात आला. या तपासणीमुळे एका व्हॅनचालकाने रांगेतून यू-टर्न घेत ...

A driver's U-turn; One found interrupted! | एका वाहनचालकाचा यू-टर्न; एक आढळला बाधित !

एका वाहनचालकाचा यू-टर्न; एक आढळला बाधित !

Next

नाशिक : पेठनजीकच्या राज्य तपासणी नाक्यावर दुपारनंतर कसून तपासणीला प्रारंभ करण्यात आला. या तपासणीमुळे एका व्हॅनचालकाने रांगेतून यू-टर्न घेत पुन्हा गुजरातच्या दिशेने पोबारा केला, तर अन्य एका वाहनचालकाचे शरीराचे तापमान जास्त आल्याने त्याची ॲंटिजेन टेस्ट करण्यात आल्यानंतर तो बाधित असल्याचे समोर आले.

पेठनजीकच्या गुजरात सीमेवर बुधवारी (दि. २) दुपारनंतर कडक तपासणीला सुरुवात झाली.. त्यावेळी प्रत्येक वाहनचालक, त्या वाहनातील अन्य प्रवासी, सहायक यांना वाहनातून उतरवून सर्वप्रथम त्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येत होते. थर्मल चेकिंग केल्यानंतर ज्यांचे तपमान सामान्य असेल त्यांना गाडीत जाऊन बसण्यास परवानगी दिली जात होती, तर संबंधित वाहनचालकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून वाहनासंदर्भात तसेच गमन स्थळाबाबत विचारणा केली जात होती. त्यात कुणाचे शरीराचे तापमान जास्त आढळले तर त्याची तत्काळ ॲंटिजेन टेस्ट करण्यात येत होती. दिवसभरात पंधराहून अधिक ॲंटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात एक वाहनचालक पॉझिटिव्ह आढळून आला. निकाल ऐकताच चालकाला रडू कोसळले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोन करून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याची तजवीज केली. तो तत्काळ रुग्णालयाकडे रवाना झाला.

नाक्यावर तपासणी सुरू असताना गुजरातकडून येणाऱ्या वाहनांच्या अधूनमधून रांगा लागत होत्या. त्यात दुपारी तीनच्या सुमारास एका व्हॅनचालकाला कसून तपासणी सुरू असल्याचे रांगेत असतानाच लक्षात आले. त्याचा क्रमांक पाचव्या- सहाव्या स्थानी असतानाच त्याने रांगेतून वाहन झटकन वळवत गुजरातच्या दिशेने यू-टर्न घेत तपासणीपासून पोबारा केला. अर्थात तो स्वत: किंवा त्या वाहनात कुणी कोरोनाबाधित असणार, अशी शक्यता तपासणी करणाऱ्या कर्मचारी वर्गाने व्यक्त केली. गुजरातकडून येणाऱ्या वाहनचालकांपैकी बहुतांश वाहनचालकांनी त्यांची वाहने थांबवली. मात्र, काही वाहनचालक अचानकपणे जोरात येऊन थांबत असल्याप्रमाणे दाखवत पुढे जाऊन सुसाट निघून गेल्याच्या काही घटनादेखील घडल्या. मात्र, असे प्रकार केवळ अपवादात्मकच घडताना दिसत होते.

Web Title: A driver's U-turn; One found interrupted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.