महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:41 AM2018-05-28T00:41:04+5:302018-05-28T00:41:04+5:30
मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानकमार्गे ये-जा करावी लागते.
इंदिरानगर : मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानकमार्गे ये-जा करावी लागते. त्यामुळे आणि महामार्ग बसस्थानकावरून नगर, मुंबई, कसारा, शिर्डी, सिन्नर, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा यांसह विविध शहरांना गावाला दररोज बसेस ये-जा करीत असतात. त्यामुळे महामार्ग बसस्थानकलगतच्या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्यावरच तीन ते चार खासगी बसेस आणि चार ते पाच खासगी वाहने प्रवासी घेण्यासाठी तासनतास रस्त्यावरच उभी राहत असतात. त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. खासगी प्रवासी वाहने नियमांची पायमल्ली करीत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला.
बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास सक्तमनाई असतानाही तासनतास खासगी वाहने कशी उभी राहतात. महामार्ग बसस्थानकातून प्रवासी पळविले जातात. खासगी वाहनांद्वारे त्यांच्यावरील कारवाई का होत नाही. दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान शहर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर सर्रासपणे खासगी बसेस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. शहर वाहतूक पोलीस विभाग फक्त प्रबोधन पुरताच उरला की काय? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.