देवळा पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:58 PM2020-04-18T15:58:47+5:302020-04-18T15:59:26+5:30
देवळा : १४ एप्रिल नंतर संचारबंदीत थोडी शिथिलता दिल्यानंतर परीस्थिती आता सामान्य झाली, असा ग्रह करून देवळा शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढू लागली होती. त्यात मालेगाव शहरात कोरोना रूग्णांची संख्या चिंता वाटावी अशा वेगाने वाढू लागल्यानंतर देवळा पोलिस सतर्क झाले. संचारबंदी व लॉक डाऊनचा नियमभंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दि. २४ मार्चपासून लॉक डाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. नागरीकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात येत होते. परंतु याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत होते. संचारबंदीच्या या काळात अत्यावश्यक सेवा देणाºया व्यतिरिक्त अन्य नागरिकांनी रस्त्यावर वाहने घेऊन कोणी फिरू नये या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांना पोलिसांनी काठीचाही प्रसाद दिला. परंतु नागरिकांवर याचाही परिणाम झाला नाही.
नियमांचे उल्लंघन करीत क्षुल्लक कारणे देत नागरिक रस्त्यांवर वावरत होते. विविध कामांच्या बहाण्याने दुचाकी सर्रास रस्त्यावर दिसत होत्या. त्यांंना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शशनाखाली गुरूवार (दि. १६) पासून शहरातील पाचकंदील चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाºया व कागदपत्रांची अपूर्तता असलेल्या वाहनचालकांवर वाहन जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
वाहनावरून फिरणाºया नागरीकांच्या कामांची पडताळणी करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण फिरणाºया वाहनांना चांगलाच आळा बसला. १४ एप्रिल नंतर वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढू लागली, यामुळे पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून नागरीकांंनी कारवाईचे स्वागत केले आहे.
सदर कारवाईत रविंद्र मल्ले, अंकुश हेंबाडे, संदीप चौधरी, सुरेश कोरडे आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांचे कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन व संचारबंदी लागू असून नागरीकांनी सोशल डिस्टंशींगचे पालन करून गर्दी करणे टाळावे व घराबाहेर पडू नये. शासनाने दिलेल्या सुचनांचे नागरीकांनी पालन करावे.
- सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक देवळा.