रविवार कारंजा परिसरात ड्रोनद्वारे फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:30+5:302021-05-13T04:14:30+5:30
शहरातील मुख्य रहदारीचा चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि. १२) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खासदार हेमंत गोडसे ...
शहरातील मुख्य रहदारीचा चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि. १२) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रोनद्वारे फवारणीला सुरुवात करण्यात आली. बंगलोर येथील गरुडा ऐरोस्पेसच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शहरातील तेरा मुख्य झोनमध्ये हायपोक्लोराईट सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी गरुडा ऐरोस्पेसचे मुख्य अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांच्याशी नाशिक शहरात ड्रोनद्वारे फवारणी संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाकडून या मोहिमेला प्रायोगिक तत्त्वावर रविवार कारंजा परिसरात सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार गोडसे यांच्यासह माजी महापौर विनायक पांडे, सचिन बांडे, नाना काळे, संजय चिंचोरे, पप्पू टिळे, वैभव खैरे, संतोष ठाकूर, विजय काकड, शाम कांगले, राजेंद्र शिरसागर, राजू राठोड, मयूर जुन्नरे आदी उपस्थित होते. (फोटो १२ ड्रोन)