चांदवड-देवळा मतदारसंघात दुरंगी लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:23 AM2019-10-08T01:23:53+5:302019-10-08T01:25:06+5:30
चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत.
चांदवड : चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या २०१४च्या निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघात ११ उमेदवारांनी उमेदवारी केली होती तर गेल्या निवडणुकीत पंचरंगी लढत झाली तर या निवडणुकीत खरी लढत दुरंगी होईल. कारण मातब्बरांनी बंडखोरी केली नसल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यात भाजपा - सेना युतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर (भाजप), राष्टय काँग्रेस व राष्टवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस) यांच्यात खरा चुरशीचा सामना होईल. एकूण ९ उमेदवार उभे आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये राजेंद्र पुंडलिक देवरे, गोविंद देवमन पगार, बाळासाहेब मधुकर माळी, शांताराम रामदास शेवाळे, सूरज सोपानराव चिंचोले असे पाच जणांनी माघार घेतली तर चांदवड -देवळा मतदारसंघात एकूण २ लाख ७७ हजार ५६४ मतदार आहेत. त्यात चांदवड तालुक्यात १ लाख ७० हजार ७४३, तर देवळा तालुक्यात १ लाख ०६ हजार ८२१ मतदार आहेत.
रिंगणातील उमेदवार...
डॉ. राहुल आहेर (भाजप), शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस), दत्तू गांगुर्डे (भारतीय कम्युनिष्ट पक्ष), सुभाष संसारे (बसपा), अनंत सादडे (स्वंतत्र भारत पक्ष), सुनील अहेर (अपक्ष), प्रकाश कापसे (अपक्ष), हरिभाऊ थोरात (अपक्ष), संजय केदारे (अपक्ष).