डाळिंबाची आवक घटल्याने भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:54 AM2019-02-21T00:54:44+5:302019-02-21T00:55:24+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार फळबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आवक घटली असली तरी दुसरीकडे परराज्यातील स्थानिक बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.

 The drop in pomegranates led to price drop | डाळिंबाची आवक घटल्याने भाव घसरले

डाळिंबाची आवक घटल्याने भाव घसरले

Next

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार फळबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आवक घटली असली तरी दुसरीकडे परराज्यातील स्थानिक बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून डाळिंबाला पाणी कमी पडत असल्याने उत्पादन काही प्रमाणात घटत चालले आहे. नाशिक बाजार समितीत संगमनेर, अकोला, अहमदनगर या भागातील डाळिंबाला विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होत असतो. नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यातदेखील मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते, मात्र  काही दिवसांपासून गुजरात राज्यातही स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने त्याचा परिणाम नाशिक बाजार समितीतून निर्यात केल्या जाणाºया डाळिंब मालावर जाणवला असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.  आवक घटल्याने डाळिंबाच्या बाजारभावात सुधारणा होणे अपेक्षित होते, मात्र परराज्यात स्थानिक मालाची आवक वाढल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर झाला म्हणून बाजारभाव वाढलेले नसल्याचे बाजार समितीच्या घटकांनी सांगितले.

Web Title:  The drop in pomegranates led to price drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.