दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण!
By श्याम बागुल | Published: November 14, 2018 03:22 PM2018-11-14T15:22:45+5:302018-11-14T15:23:18+5:30
नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतक-यांचा समावेश
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, वाढत्या शेतकरी आत्महत्येचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांच्या लागोपाठ होणा-या आत्महत्येमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणा-या शेतक-यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतकºयांचा समावेश अधिक चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्येची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली तरी, अशा आत्महत्येमागच्या कारण मिमांसा देखील तितक्याच विचार करायला लावणा-या आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटूंबियाला शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतक-याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते. पोलीस,महसूल व कृषी विभागाकडून सर्वकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतक-यांपैकी फक्त २६ शेतक-यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ४९ शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तीक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे. १४ आत्महत्येच्या घटनेची अद्यापही चौकशी केली जात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरी व पाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. यातील विशेष म्हणजे शासनाने दुष्काळ जाहीर करतांना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला तर निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया येवला, चांदवड, देवळा या तालुक्यात मात्र शेतकरी आत्महत्येची संख्या अगदीच अल्प आहे तर पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबर अखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्येच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.