पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:26 PM2019-08-27T22:26:12+5:302019-08-27T22:26:28+5:30
देवगाव : वर्षभर राब-राब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. देवगाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारपेठेत पोळा सणाचे साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
देवगाव : वर्षभर राब-राब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. देवगाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारपेठेत पोळा सणाचे साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
देवगाव व परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांच्या दृष्टीने हा पोळा सण महत्वाचा असल्याने मंगळवारी देवगाव आठवडे बाजारात लाडक्या सर्जा-राजाला सजवण्याचे साहित्य खरेदी करतांना शेतकरी हताश होत काहिसा काटकसर करतांना दिसला.
कुठल्याच भाजीपाल्याला समाधानकारक बाजारभाव नाही. परिसरात मुख्य पिक असलेल्या कांदा दर दिवसेदिवस उतरत आहे. उत्पादन खर्चापेक्षा अत्यल्प किमतीत कांदा विकावा लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीचे परिणाम शुक्र वारच्या बैलपोळा सणाच्या खरेदिवर दिसुन आले. दि.३० रोजी बैलपोळा सण आला तरी तालुक्यातील बाजारपेठ मात्र ठप्पच आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा शेतकरी वर्गात बैल साज खरेदीचा विशेष उत्साह दिसत नसल्याचे काही व्यापाºयांनी सांगितले. सतत राब-राब राबणाºया बैलाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा पोळा हा एकमेव दिवस असल्याने कमी प्रमाणात का होईना या देवगाव आठवडे बाजारात शेतकरी साज खरेदी करताना दिसत होते.
प्रतिक्र ीया .....
शेतमालाचे उतरलेले बाजारभाव व अत्यल्प पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पाशर््वभुमीवर पोळा सणाच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसला आहे. शेतात वर्षभर राबणाºया बैलांच्या प्रेमापोटी कमी प्रमाणात का होईना पोळा सणाचे साहित्य खरेदी आज केली.
- गोपिनाथ मेमाणे, शेतकरी. महादेवनगर.
प्रतिकिया ......
सालाबादप्रमाणे यंदाही सजावटीचे मोठ्या प्रमाणात साहित्य विक्र ी करण्यासाठी आणले. मात्र, या वर्षी पावसाने पाठ फिरवली. त्यातच शेतीमालाला देखील बाजारभाव नसल्याने शेतकºयांची आर्थिक अडचण असल्याने सजावटीसाठी सर्व नवीन साहीत्य घेण्यास टाळाटाळ करीत असुन, हात आखडता घेतांना दिसून येत आहे. महागाईमुळे ग्राहक भाव विचारु न पुढे निघुन जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
- गणेश लोहारकर, साहित्य विक्र ेता, देवगाव.