दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM2018-04-11T00:11:12+5:302018-04-11T00:11:12+5:30

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले.

Drought: Drinking water for villages in Kasamade belt will solve; Order to release water from the Bharnyanaman, Chankapur dam during the period | दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

Next
ठळक मुद्दे५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात १० दिवस १००० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल मालेगाव पाटबंधारे विभागाने नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिल्याने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चणकापूर धरणातून पाणी सोडून कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ.राहुल अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांनी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी केली होती. संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दि. १० ते १९ एप्रिलपर्यंत दहा दिवस पाण्याचे आवर्तन चालणार असून, या काळात अनधिकृत उपसा करणाºया विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, आवर्तन कालावधीत पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. आवर्तन काळात इंधनावर चालणारे व वीजपंप जप्त करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आवर्तनादरम्यान पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. आवर्तन काळात आदेशाचे पालन न करता मनमानी करणाºयांना प्रशासनाच्या वतीने चाप लावला जाणार असून, याबाबत वीज वितरण कंपनी, मालेगाव पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे.

Web Title: Drought: Drinking water for villages in Kasamade belt will solve; Order to release water from the Bharnyanaman, Chankapur dam during the period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण