खामखेडा परिसरात दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:59 PM2018-10-08T15:59:47+5:302018-10-08T15:59:55+5:30
खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.
पिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशा
खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.
चालू वर्षी खामखेडा परिसरात सुरवातीला अल्प पाऊस झाला.या पाऊसावर खरिपातील बाजरी,मका भुईमूग, तूर,सोयाबीन आदी पिकाची पेरणी केली.हि खरिपातील पिके आता पर्यत पडणा्नº्या पाऊसामुळेवर आली.परंतु ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके असतांना पाऊसाने पुन्हा दांडी मारली .आणि पिके कणसामघ्ये पूर्णपणे दाण्यांनी भरले नाही .त्यामुळे धान्याची उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे.खरिपाची पिके जमतेम पाऊसाच्या पाण्यावर कशी बशी आली.परंतु आता रब्बीच्या पिकाचे कसे नियोजन करावे याची चिंता शेतकरी करीत आहे.
गेल्या वर्षीही सुरवातीला कमी पाऊस झाला होता.परंतु परतीच्या पावसाने गेल्या वर्षी जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे नदी-नाल्याना मोठया प्रमाणात पूर आल्याने शिवारातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यामुळे रब्बी पिकातील गव्हू, हरभरा रांगडा कांद्यासह उन्हाळी कांद्याची पीक भरपूर प्रमाणात आली होती.परंतु या वर्षी सुरवातीपासूनच पावसाची व्रक दृटी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही .त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.
परंतु शेतकº्याला अपेक्षा परतीच्या पाऊसावर होती.परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी न आल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरींना अजूनही पाणी न उतरल्यामुळे आतापासून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दर वर्षी दिपावळीपर्यत वाहणारे नाले या वर्षी त्यांना पाणीच न आल्याने आध्याप कोरडेच आहेत.तसेच दर वर्षी साधारण पर्यत दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी ओक्टॉबर महिन्यात कोरडी होत चालली आहे.परतीचा पाऊस जवळपास संपला आहे.आता शेतकऱ्याला अपेक्षा नवरात्र मघ्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.जर या नवरात्र मघ्ये पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाº्याचा मोठ्या प्रश्न निर्माण होणार आहे.