भुसे यांच्याकडून दुष्काळ आढावा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:59 PM2018-08-12T23:59:18+5:302018-08-13T00:29:48+5:30
मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.
मालेगाव : मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.
तालुक्यात दोन महिन्यात फक्त १०० मि.मी. पाऊस झाला असून पेरणी झालेले क्षेत्र होरपळून गेले आहे. तालुक्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही. मालेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला आहे. आता पाऊस आला तरी पिकांच्या उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक भुसे यांनी ३ आॅगस्ट रोजी घेतली असून अधिकाºयांना टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. भुसे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा गेल्या शुक्रवारी सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, आघार खु., पाटणे, वाके, मुंगसे, टेहरे येथे तर रविवारी सायने खु., दहिकुटे, माणके, चिखलओहोळ, नाळे, शेंदुर्णी, साजवहाळ, भिलकोट, देवारपाडे, गुगुळवाड, पळासदरे, झोडगे, कंधाणे, दहिदी, करंजगव्हाण, लेंडाणे, वडगाव या गावांचाल दौरा केला. सदर गावातील नागरिकांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सदर दौºयाप्रसंगी भुसे यांचे समवेत तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख श्रीराम मिस्तरी, जि. प. सदस्य दादाजी शेजवळ, प्रमोद पाटील, तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी पगार, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, वीज वितरणचे वडगे, सांगोडे, इवद उपअभियंता सूर्यवंशी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश
तालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे चाराटंचाई, पाणीटंचाई, गुरांसाठी छावणी, दुबार पेरणीचे संकट या भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन राज्यमंत्री भुसे यांनी दौºयाप्रसंगी ग्रामस्थांना केले. आपल्या गावात टंचाईबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. प्रत्येक गावातील समस्यांची अधिकाºयांनी तातडीने नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.