दरेगाव परिसरात दुष्काळाच्या झळा

By admin | Published: March 10, 2016 11:01 PM2016-03-10T23:01:57+5:302016-03-10T23:17:31+5:30

चाराटंचाई: दुग्ध व्यवसायावर परिणाम

Drought situation in the area of ​​Daregaon | दरेगाव परिसरात दुष्काळाच्या झळा

दरेगाव परिसरात दुष्काळाच्या झळा

Next

 ंदरेगाव : चांदवड तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या पूर्व भागात यंदा विदारक परिस्थिती आहे. या भागात चारा आणि पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
तालुक्यातील दरेगाव, निमोण, डोणगाव, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, मेसनखेडे, शिंगवे, वागदर्डी, कातरवाडी, वडगाव, कोकणखेडे, दुगाव, पिंपळगाव वाखारी, रायपूर, अहेरखेडे या गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील जनतेला सलग तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेती उत्पादनाचे अर्थकारण बिघडले आहे. चाराटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. विहिरी कोरड्याठाक झाल्याने हिरवा चारा घेणे अशक्य झाले आहे. पावसाळा सुरू होण्यास चार महिन्यांचा कालावधी आहे. पशुपालकांनी कोरडा चारा साठवणुकीवर भर दिला आहे. मागणीनुसार चारा उपलब्ध नसल्याने चारा शंभर पेढीला दीड हजार रुपये झाला आहे. गवताच्या पेंढ्या १२ हजार रुपये शेकडा दराने मिळत आहेत. चाऱ्याअभावी परिसरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. तसेच जनावरांना पाणी उपलब्ध करायचे कुठून असा पश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)

Web Title: Drought situation in the area of ​​Daregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.