देशमाने परिसरात दुष्काळाची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:20 PM2019-02-04T17:20:12+5:302019-02-04T17:22:08+5:30
देशमाने : परिसरात पडलेला अल्प पाऊस, पालखेड कालव्याचे मिळालेले अल्प असे आवर्तन यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही यक्ष प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. तर उभी असलेली रब्बी पिके अर्ध्यावरच माना टाकू लागल्याने भविष्यातील दुष्काळाची चित्रे परिसरात स्पष्ट दिसू लागली आहेत.

देशमाने व लगतच्या मानोरी(बु), मानोरी(खु), मुखेड, वाहेगाव, भरवस, जऊळके, जळगाव (नेऊर) आदी गाव-परिसरात पावसाने ओढ दिली. जेमतेम पावसावर खरीप हंगामात सोयाबीन, मक्याचे पीक शेतकºयांनी उभे केले. मात्र अल्प पावसाने उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे.
पालखेड डावा कालव्याचे दोन पैकी एकच आवर्तन मिळाल,े तेही उशिरा अन अल्पसे. परिणामी अल्प पाऊस अन् कालव्याचे पाणी यामुळे विहिरींनी अकालीच तळ गाठल्याने पिण्याचा पाण्यासह शेतात उभ्या पिकांना कसे जगवावे असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. फेब्रुवारी महिनाअखेर वाडी-वस्त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.
अल्प पावसामुळे परिसरात खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक मक्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले. मका पीकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्याने चाºयाचे प्रमाण घटले. अनेक शेतकºयांकडे ८ ते १५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. आगामी काळात पाणी अन चाºयाच्या समस्येने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत असून लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
परिसरात नगदी पीक म्हणून कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकºयांवर घसरलेल्या भावामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. एकूणच आगामी दुष्काळाची चिन्हे परिसरात गडद होऊ लागली आहेत.