देवळा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:22+5:302021-09-27T04:15:22+5:30
गतवर्षी उन्हाळी कांदा बियाणाच्या टंचाईमुळे लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. तसेच कांदा काढणीच्या वेळेस मजूर टंचाई व तीव्र ...
गतवर्षी उन्हाळी कांदा बियाणाच्या टंचाईमुळे लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. तसेच कांदा काढणीच्या वेळेस मजूर टंचाई व तीव्र उष्णतेमुळे शेतातून कांदा काढणीस उशीर झाला. शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा लवकर सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प दरात तोटा खाऊन आपल्याकडील सर्व कांदा विकून टाकला. आता कांद्याचे दर थोडेफार वधारत असताना अल्प शेतकऱ्यांकडे थोडाफार उन्हाळी कांदा शिल्लक आहे. पावसाने अशीच पाठ फिरवली तर पुढे पाण्याअभावी उन्हाळी कांदा काढणे अशक्य होणार असल्यामुळे कमी कालावधीत येणारा खरिपाचा लाल कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. लाल कांदा रोपांना मागणी वाढली असून शेतकरी रोपे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत. यामुळे कांदा रोपांची टंचाई निर्माण झाली असून अव्वाच्या सव्वा दर देऊन रोपे घेतली जात आहेत.
इन्फो
किशोर सागर धरणात अल्पसाठा
तालुक्याची एकमेव आशा असलेल्या चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातून पूर पाणी सोडण्यात आलेले असून ते रामेश्वर येथील किशोर सागर धरणात दोन महिन्यांपासून संथगतीने जमा होत आहे. किशोर सागर धरण अद्याप भरलेले नाही. यामुळे किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेची अपेक्षा पूर्ण होण्याची चिन्हे मात्र आता धूसर होऊ लागली आहेत.
फोटो - २६ किशोरसागर डॅम
किशोर सागर धरणात सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा.
260921\26nsk_25_26092021_13.jpg
फोटो - २६ किशोरसागर डॅमकिशोर सागर धरणात सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा