सिन्नरच्या पूर्वभागात दुष्काळसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:41 PM2018-10-30T17:41:41+5:302018-10-30T17:41:57+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने तसेच यंदा पाऊस रुसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामही पाण्याअभावी धोक्यात आला आहे.
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने तसेच यंदा पाऊस रुसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामही पाण्याअभावी धोक्यात आला आहे. पावसाच्या अवकृपेने कधी नव्हे एवढी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.
यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात कोठेही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. खरीप हंगामात बाजरी, सोयबीन, मठ-मूग, मका आदी पिकांची पेरणी केली. परंतु पाऊस न झाल्याने हाती आलेले पिकही वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्न आले नाही. परिणामी मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च, सणवार व रोजचा खर्च यासाठी पैसा उभा करण्यासाठी शेतकºयांना कर्जबाजारी व्हावे लागते आहे. खरीप वाया गेला तरी त्याची झीज रब्बी हंगामात भरुन काढू अशी अपेक्षा असतानाच पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. त्यातही पूर्व भागात अजिबात पाऊस झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांना पिके घेता आली नसल्याने बळीराजालाही यंदा धान्य विकत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांची अवस्था तेल ही गेले तुपही गेले... अशी झाली आहे.