दुष्काळावरून नाशिक जिल्ह्यातील राजकारण रंगणार !

By श्याम बागुल | Published: October 24, 2018 01:15 PM2018-10-24T13:15:25+5:302018-10-24T13:18:23+5:30

वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थतीशी झगडणाऱ्या येवला तालुक्याचा दुष्काळ सदृष्य परिस्थितीत समावेश न करण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक व तितकीत राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मानले जात आहे.

Drought will play politics in the district! | दुष्काळावरून नाशिक जिल्ह्यातील राजकारण रंगणार !

दुष्काळावरून नाशिक जिल्ह्यातील राजकारण रंगणार !

Next
ठळक मुद्दे येवला तालुक्याचा समावेश नसल्यामुळे भुजबळ यांनी तीव्र नाराजी चांदवडला मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले.

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे जिल्ह्यातील येवला तालुक्याला वगळण्याची तर चांदवड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केल्याने त्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जाणे शक्य आहे.
वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थतीशी झगडणाऱ्या येवला तालुक्याचा दुष्काळ सदृष्य परिस्थितीत समावेश न करण्यात आल्याची बाब आश्चर्यकारक व तितकीत राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मानले जात आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने एमआरसॅक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कृषी खात्याने पडलेल्या पावसाच्या आधारेच तालुक्यांची निवड केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याातील तीनच तालुक्यांची निवड करण्यात आल्याने व त्यात छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्याचा समावेश नसल्यामुळे भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले होते. मुळात येवला तालुक्याला पावसाळ्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला तसेच आजमितीला ४२ गावे, वाड्यांना १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही भुजबळ हे राष्टÑवादीचे नेते असल्यामुळेच त्यांच्या तालुक्यावर अन्याय करण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसाच काहीसा प्रकार देवळा-चांदवड तालुक्याबाबतही घडला असून, भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर हे दोन्ही तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्यातही त्यांची कर्मभुमी देवळा असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीत देवळा तालुक्याचा समावेश करण्यात आला, परंतु टंचाईचा सामना करीत असलेल्या चांदवडला मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आमदार राहूल अहेर यांनी आपल्या स्वत:च्या तालुक्यातील जनतेलाच दुष्काळ सदृष्य परिस्थितीचा लाभ मिळवून दिल्याची भावना चांदवड तालुक्यात व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत विरोधकांकाडून हाच प्रचाराचा मुद्दा उपस्थित करून चांदवडकरांच्या भावनेला हात घातला जावू शकतो. इगतपुरी -त्र्यंबकेश्वर मतदारसंघ कॉँग्रेसकडे असून, निर्मला गावित हे त्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील पीक परिस्थितीचा विचार करून शासनाने तालुका दुष्काळ सदृष्य म्हणून जाहीर केला, परंतु पाणी टंचाई व पिके हातची गेलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याला त्यातून वगळल्याने जी परिस्थिती भाजपाचे आमदार राहूल अहेर यांची झाली, तशीच अवस्था निर्मला गावीत यांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांकडून त्र्यंबकेश्वरच्या मतदारांना या प्रश्नावरून ‘हवा’देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Web Title: Drought will play politics in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.