गुंगीचे औषध विक्री; पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:49 AM2020-08-31T01:49:14+5:302020-08-31T01:51:08+5:30
शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार, रिक्षा व औषध असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालेगाव मध्य : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कार, रिक्षा व औषध असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी संशयित सईदअली साहेबअली (३६, रा. अय्युबनगर), शोएबअली असगरअली (२४, रा. तडवीनगर), जावेद अहमद अब्दुल रज्जाक (३६), शेख जफर शेख अहमद (३२, दोघे, रा. चमननगर) यांना अटक करण्यात आली. अधिक तपास करीत औषधांचा पुरवठा करणारा नासीरअली नैयरअली सय्यद (२६) या व्यावसायिक प्रतिनिधीला (एम.आर.) जळगाव जिल्ह्यातील पिंपळकोठे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यात गुंगीच्या विविध कंपन्यांची औषधे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा (क्र.एमएच ४१. बी २७८७), कार (क्र. एमएच ४१ सी २७७८) व औषधी असा २ लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या विशेष कारवाई पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलीस नाईक पाडवी, पोलीस शिपाई भावसार, मोरे, पाटील, गोविंद बिºहाडे यांचा समावेश होता. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड करीत आहेत.