औषध टंचाई रुग्णांच्या मुळावर

By admin | Published: May 30, 2017 12:25 AM2017-05-30T00:25:54+5:302017-05-30T00:26:06+5:30

राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशाप्रकारची अत्यावश्यक औषधी मिळणे बंद झाले असून, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे.

Drug Scarcity Patients | औषध टंचाई रुग्णांच्या मुळावर

औषध टंचाई रुग्णांच्या मुळावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : हिमोफिलिया रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली औषधे वेळेत खरेदी न करता टेंडर प्रक्रियेत अडकवण्याचा असंवेदनशील प्रकार राज्यशासनाच्या आरोग्य विभागात घडत असून, त्यामुळे राज्यभरात या रुग्णांच्या औषधांची टंचाई जाणवत आहे. राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशाप्रकारची अत्यावश्यक औषधी मिळणे बंद झाले असून, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे. अशाप्रकारची अत्यावश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांना खासगी दुकानांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत असून, त्यामुळे शासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात हिमोफिलियाचे सुमारे साडेतीनशे रुग्ण असून, ते अ व ब अशा दोन प्रकारांत वर्गीकृत करण्यात आले आहेत. या रुग्णांना विशिष्ट प्रकारच्या रक्तघटकाची (फॅक्टर ८ व ९) कमतरता असते. या युनिटची खासगी बाजारपेठेत एका युनिटची किंमत साडेनऊ ते दहा रुपये असून, असे रुग्णाच्या वजनेच्या तुलनेत विचार करता एक ते दीड हजार युनिटची सामान्यत: आवश्यकता असते. त्याची किंमत सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे शासनाने रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली औषधे मोफत देण्याची सुविधा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिली असून, हिमॅटॉलॉजी विभागात उपलब्ध असतात. परंतु दरवर्षी मार्च महिन्यानंतर ही औषधे मिळणे बंद होतात.
शासनाकडून निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे, ती राबविल्यानंतर औषधे उपलब्ध होतील, असे सांगून रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून परत पाठविले जाते. काही प्रमाणात कोटा उपलब्ध झालाच तर कोणत्याही कमी
अधिक प्रमाणात ते उपलब्ध करून दिली जातात. परंतु ते पुरेसे नसल्याने खासगी औषधालयांतून हे औषध महागड्या दराने खरेदी करावे लागते आहे.
एकीकडे शासन महाशिबिरे भरवत असताना दुसरीकडे मात्र हिमोफिलिया रुग्णांचे मात्र हाल होत असून, शासन जिवावर उठल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: Drug Scarcity Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.