सभापतींच्या पाहणीतच घरोघरी औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:15 AM2021-08-01T04:15:06+5:302021-08-01T04:15:06+5:30
सिडको प्राभाग २८ मधील वृंदावन नगर येथे सभापती सुवर्णा मटाले यांनी डेंगू, चिकनगुनिया याबाबत पाहणी दौरा करून ...
सिडको प्राभाग २८ मधील वृंदावन नगर येथे सभापती सुवर्णा मटाले यांनी डेंगू, चिकनगुनिया याबाबत पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. सध्या डेंग्यू ,चिकनगुनिया याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी जनजागृती करून मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाहणी करून सर्वत्र फवारणी करून ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आढळले, त्या ठिकाणी विशिष्ट औषधाची फवारणी केली जात आहे. त्याच बरोबर पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडल्याने बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचनाही केल्या.
चौकट====
यावेळी आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना काही सूचना करण्यात आल्या. पाण्याचा हौद, टाक्या, रांजण, कूलर, फ्रिजचा ड्रीप पॅन, झाडांच्या कुंड्यामधील साचलेले पाणी हे आठवड्यातून एकदा स्वच्छ करून साठवलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
(फोटो ३१ मटाले) सिडको प्रभाग क्रमांक २८ मध्ये डेंग्यू, चिकनगुनियाबाबत जनजागृती करताना सभापती सुवर्णा मटाले समवेत मनपा कर्मचारी.