नाशिकमध्ये शिंदे गटाने वाजवले ढोल; पालकमंत्री दादा भुसेंनी सादर केले तीन पावली नृत्य
By संजय पाठक | Published: September 28, 2023 12:47 PM2023-09-28T12:47:59+5:302023-09-28T12:48:12+5:30
गणेशोत्सव मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ
नाशिक- नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ढोल वाजवण्यात आले. विशेष म्हणजे पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही ढोल पथकाकडील ढोल घेऊन वादन केले तर पालकमंत्री दादा भुसे हे ढोल ताशाच्या तालावर थिरकले.
नाशिक शहरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीला वाकडी बारव येथून प्रारंभ होणार होता मात्र तो काहीसा विलंबाने झाला आहे. मिरवणुकीच्या शुभारंभासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि अन्य विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित आहेत निवडणुकीच्या प्रारंभी पालकमंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवले तसेच पालकमंत्री यांनी देखील तीन पावली नृत्य केले. दरम्यान, आज सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी सुरुवात झाली असून विविध भागात वाजत गाजत गणरायाला विसर्जन स्थळी आणून निरोप दिला जात आहे.
नाशिक - नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ढोल वाजवण्यात आले. विशेष म्हणजे पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही ढोल पथकाकडील ढोल घेऊन वादन केले तर पालकमंत्री दादा भुसे हे ढोल ताशाच्या तालावर थिरकले. pic.twitter.com/WYZvgGbRw8
— Lokmat (@lokmat) September 28, 2023