ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह : शहरात पोलिसांकडून नाकाबंदी ‘ब्रेथ अॅनालाइजर’द्वारे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:11 AM2018-01-01T01:11:43+5:302018-01-01T01:12:28+5:30
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकाचौकांत वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती, तर ग्रामीण भागात महामार्ग, धाबे, हॉटेल्स यावर पोलिसांनी नजर होती़ दरम्यान, मद्यपी वाहनचालक, धिंगाणा घालणाºया टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली.
रात्री १२ वाजेनंतर शहरात ‘थर्टी फर्स्ट’चा ठिकठिकाणी जल्लोष पाहावयास मिळत होता. मिठाईची दुकाने, हॉटेल व मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. दरम्यान, पोलिसांनी मात्र ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली होणाºया धिंगाण्यावर करडी नजर ठेवली होती. टवाळखोरांकडून किंवा मद्यपींकडून कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच ‘पॉइंट’वर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, आनंदवली रस्ता, मखमलाबाद-आनंदवली गोदाकाठ रस्ता, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर आदी भागांमध्ये पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक चौकामध्ये तसेच सिग्नलवर पोलीस कर्मचाºयांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी मद्यप्राशन अथवा कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आल्यास वाहनचालकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जात होते़ पोलिसांकडून संशयित वाहनांची विविध पॉइंटवर कसून तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे वाहनचालकांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनचालकांनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे की नाही, याची चाचणी ‘ब्रेथ अॅनालाइजर’ यंत्राद्वारे केली जात होती. या चाचणीमध्ये अमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून येणाºया वाहनचालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येत होते़
कडक पोलीस बंदोबस्त़़़
नाशिक शहरासह ग्रामीण भागातील सर्वच ‘हॉट पॉइंट’वर पोलिसांचा ‘वॉच’ होता. शहरातील परिमंडळ-१ व परिमंडळ-२ च्या हद्दीत पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह सर्वच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला-पुरुष पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान असे सुमारे दोन हजार पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले होते, तर ग्रामीण भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते़