कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:42 AM2018-01-08T00:42:23+5:302018-01-08T00:44:19+5:30

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

 Dry the grape due to the cold winter | कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

Next
ठळक मुद्दे शहर परिसरात कडाक्याची थंडी द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढले

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.
आधी बेमोसमी पावसाचा फटका आणि नंतर सलग ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशके व औषधांची फवारणी करून वाचवलेल्या द्राक्षबागा आता कडाक्याच्या थंडीमुळे संकटात सापडल्या असून, मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत वातावरणात कमालीचे चढ-उतार होत आहेत. दिवाळीपश्चात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री काहीसे थंड असे वातावरण कायम आहे. त्यामुळे धड ना थंडी ना उकाडा अशी दोलायमान अवस्था असताना काही दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसानंतर वातावरणात बदल होऊन सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला.द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढलेसंक ट टाळण्यासाठी शेतकºयांना अंतिम टप्प्यात महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता माल काढणीला आला असताना तपमान घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Web Title:  Dry the grape due to the cold winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.