स्वागतयात्रा रद्द झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:41+5:302021-04-14T04:13:41+5:30
ठाण्याच्या धर्तीवर इंदिरानगर परिसरातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपत नववर्षी गुढीपाडव्याच्या सणाला विविध ठिकाणाहून सुमारे १८ वर्षांपासून जल्लोषात स्वागतयात्रा निघत ...
ठाण्याच्या धर्तीवर इंदिरानगर परिसरातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपत नववर्षी गुढीपाडव्याच्या सणाला विविध ठिकाणाहून सुमारे १८ वर्षांपासून जल्लोषात स्वागतयात्रा निघत होत्या. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात येत होते. त्यामुळे नाशिक शहरात इंदिरानगर परिसरातून निघणाऱ्या स्वागत यात्रा सर्वांचे लक्ष केंद्रित करीत होती. साईनाथ नगर चौफुली, कमोद नगर, गजानन महाराज मंदिर, सावरकर चौक, श्रीराज सारथी सोसायटी, राजीव नगर, वनवैभव कॉलनी, सदिच्छा नगर, चेतना नगर, पाथर्डी फाटा, अशा सुमारे १३ ते १४ ठिकाणी स्वागत यात्रा जल्लोषात निघायची; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाच्यावतीने कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातून निघणाऱ्या स्वागत यात्रा रद्द करण्यात आल्याने सकाळी रस्त्यावर शुकशुकाट होता