दोन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:55 AM2021-01-07T01:55:45+5:302021-01-07T01:56:05+5:30

देशपातळीवर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन काही ठराविक जिल्ह्यात झालेला असताना प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला तयारीचा भाग म्हणून त्याचबरोबर नागरिकांमध्ये या लसीकरणाविषयी संभ्रम दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसात लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Dry run of vaccination in the district in two days | दोन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन

दोन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन

Next
ठळक मुद्देआढावा : वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणार लस 

नाशिक : देशपातळीवर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन काही ठराविक जिल्ह्यात झालेला असताना प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला तयारीचा भाग म्हणून त्याचबरोबर नागरिकांमध्ये या लसीकरणाविषयी संभ्रम दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसात लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील २५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी प्रत्यक्ष लस देण्यात येऊन त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. देशपातळीवर कोरोना प्रतिबंध लसीकरणाला चालू महिन्यात प्रारंभ करण्यात येणार असून, त्याची तयारी म्हणून गेल्या आठवड्यात देशपातळीवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. 
राज्यात नंदुरबारसह चार ठिकाणी यापूर्वी चाचणी घेण्यात आली. यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व महापालिका क्षेत्रात येत्या दोन दिवसात ड्राय रन घेण्याचे नियोजन केले जात आहे. या संदर्भात बुधवारी जिल्हा रूग्णालयात तयारीची बैठक घेण्यात आली. या रनसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हास्तरीय रूग्णालय अशा ठिकाणी तर महापालिका क्षेत्रातही मनपा रूग्णालयाची निवड करण्यात आली आहे. 

Web Title: Dry run of vaccination in the district in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.