सुकेणे परिसर पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:40 AM2018-08-14T01:40:14+5:302018-08-14T01:40:30+5:30
पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरावर दुबार पेरणीची संकट ओढवले असून, द्राक्षबागा संकटात आल्या आहेत.
कसबे सुकेणे : पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरावर दुबार पेरणीची संकट ओढवले असून, द्राक्षबागा संकटात आल्या आहेत. आॅगस्ट महिना संपला तरीही परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, शिरसगाव, पिंपळस (रामाचे), वडाळी नजिक या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. कसबे सुकेणे, दीक्षी, सय्यद पिंपरी परिसरात पावसाअभावी द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातून डाव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी कसबे सुकेणेचे नाना पाटील, आनंदराव भंडारे, सचिन पाटील, धनंजय भंडारे, ऋषभ जाधव, सुदाम जाधव, अश्विनी रामराव मोगल, सर्जेराव मोगल, विजय मोगल, सचिन मोगल, शेतकरी संघटनेचे रामकृष्ण बोंबले आदींनी केली आहे.