मेशीत बंदमुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 07:02 PM2021-04-08T19:02:27+5:302021-04-08T19:03:14+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कडक केले आहेत. तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार मेशी ग्रामपंचायतीनेही संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने आणि व्यवसाय कडकडीत बंद आहेत.

व्यावसायिक आणि दुकानदारांनी यात सहभाग घेतला आहे. तसेच ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सध्या सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. संचारबंदीमुळे व नियमांचे पालन केल्यामुळे कोरोना नक्कीच आटोक्यात येईल, असे जाणकारांचे मत आहे. देवळा शहरासह ग्रामीण भागातही बाधितांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना याची जाणीव झाली आहे. सध्या कडक उन्हाचे चटके बसू लागले असून, शेतीची कामेही सुरू आहेत. मात्र, असे असले तरी शेतातील कामे करतानाही मजूर तसेच शेतकरीही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेत आहेत.