मालेगावी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, व्यापाऱ्यांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:24+5:302021-04-07T04:14:24+5:30

मालेगावच्या गूळ बाजारात शहरासह तालुक्यातून ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने येत असतो. परंतु आज बाहेर गावाहून कुणी व्यापारी अथवा ग्राहक ...

Dryness in Malegaon markets, displeasure among traders | मालेगावी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, व्यापाऱ्यांत नाराजी

मालेगावी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, व्यापाऱ्यांत नाराजी

Next

मालेगावच्या गूळ बाजारात शहरासह तालुक्यातून ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने येत असतो. परंतु आज बाहेर गावाहून कुणी व्यापारी अथवा ग्राहक बाजारपेठेत फिरकले नाहीत. गूळ बाजारात इतर दुकाने बंद असताना बॅग हाऊस संचालक केवळ वृत्तपत्र वाचताना दिसून आला. पोलिसांना कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही. नेहमी भरभरून वाहणाऱ्या किडवाई रस्त्यावर देखील शुकशुकाट दिसून आला. कपडे विक्रेते देखील ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. उन्हाळा सुरू झाल्याने थंडगार पाण्यासाठी विक्रीस आलेले माठ मांडून विक्रेता ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून आला. कॅम्प आणि संगमेश्वर भागातील बाजारपेठ देखील ओस पडल्याचे दिसून आले. नेहमी गर्दी करणाऱ्या ग्राहकांनी शासनाच्या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद दिला. कर्ज काढून आणि मित्र नातलगांकडून कर्ज घेऊन सुरू केलेले व्यवसाय बंद पडल्याने व्यावसायिकांत नैराश्य दिसून आले.

व्यापारी-पोलिसांत संभ्रम

मालेगावात लॉकडाऊन लागल्यानंतर कोणते व्यवसाय सुरू ठेवायचे आणि कोणते बंद करायचे याबाबत व्यापारी आणि पोलिसात संभ्रम आहे. कारण आपापल्या भागात असणाऱ्या पोलीस ठाण्यात जाऊन कोणते व्यवसाय सुरू ठेवायचे आणि कोणते बंद ठेवायचे याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. तुम्ही वृत्तपत्र वाचून घ्या, त्यात माहिती दिली आहे असे पोलीस अधिकारी सांगत आहेत. मनपा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करावी अशी मागणी होत आहे.

व्यापारी प्रतिक्रिया

राज्यात लॉकडाऊन लागल्यामुळे आर्थिक नुकसान होऊन उपासमारीची वेळ येणार आहे. व्यापारी, नातेवाईक व इतरांकडून कर्ज व हात उसनवार पैसे घेऊन नव्याने व्यवसाय सुरू केला होता. त्यांची कर्जफेड करीत असताना लॉकडाऊन लागला. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची संख्याही घटली आहे. राज्य शासनाने आर्थिक मदत करून व्यवसाय सुरू करण्यास मदत करावी.

- ईश्वर मैत्राम, रेडिमेड कपडे विक्रेता, किदवाई रोड

(फोटो - ०६ मालेगाव ७)

शासनाने लॉकडाऊन जरूर लावावा. परंतु व्यापाऱ्यांना आर्थिक मदतदेखील केली पाहिजे. अन्यथा उपाशी मरण्याची वेळ येईल. रोज धंदा बंद राहिल्यास कुटुंब कसे चालविणार. आमचे प्रश्न शासनाने समजून घ्यावेत आणि आर्थिक मदत करावी.

- मुश्रीफ अहमद, कापड विक्रेता, किदवाई रोड

(फोटो - ०६ मालेगाव ८)

===Photopath===

060421\06nsk_9_06042021_13.jpg~060421\06nsk_10_06042021_13.jpg

===Caption===

ईश्वर मैत्राम~मुश्रीफ अहमद

Web Title: Dryness in Malegaon markets, displeasure among traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.