दुहेरी मार्गाचा प्रयत्न काही वेळेतच फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:13 AM2018-08-08T01:13:23+5:302018-08-08T01:16:55+5:30

नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत व खंडित होण्याचा परिणाम अन्य उपरस्त्यांवर होऊ लागल्याने शहर पोलिसांनी रविवार कारंजा ते सांगली बॅँक सिग्नलदरम्यान एकेरी असलेली वाहतूक दुहेरी करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहनांच्या संख्येमुळे जागोजागी होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे पोलिसांनी अवघ्या काही वेळेतच आपला निर्णय फिरवला.

Dual road effort was resolved in some time | दुहेरी मार्गाचा प्रयत्न काही वेळेतच फसला

दुहेरी मार्गाचा प्रयत्न काही वेळेतच फसला

Next
ठळक मुद्देरविवार कारंजा ते सांगली बॅँक कॉर्नरवर वाहतूक कोंडी

नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत व खंडित होण्याचा परिणाम अन्य उपरस्त्यांवर होऊ लागल्याने शहर पोलिसांनी रविवार कारंजा ते सांगली बॅँक सिग्नलदरम्यान एकेरी असलेली वाहतूक दुहेरी करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहनांच्या संख्येमुळे जागोजागी होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे पोलिसांनी अवघ्या काही वेळेतच आपला निर्णय फिरवला.
शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका यादरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने यामार्गावरील रस्ता वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, एकेरी वाहतूक वळविण्यात आल्याने त्याचा परिणामी या रस्त्याला जोडणाºया उपरस्त्यांवर होऊ लागला अशातच शहर बस वाहतुकीसाठी हाच रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे अरुंद रस्ता व त्यात वाहतुकीची कोंडी होत असल्याने त्यावर उपाय म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून एकेरी वाहतूक सुरू असलेल्या रविवार कारंजा ते सांगली बॅँक सिग्नलचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करून शालिमारकडून सीबीएसमार्गे रविवार कारंजाकडे जाऊ पाहणाºया वाहनांना सुरळीत मार्गक्रमण करणे शक्य होईल, अशा हिशेबाने शहर वाहतूक पोलिसांनी विशेष अधिसूचना काढून मंगळवार व बुधवार असे दोन दिव 0दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल यादरम्यान दुहेरी वाहतूक सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी या रस्त्यावर तात्पुरते दुभाजक टाकण्यात आले. परंतु या रस्त्यावर मुळातच असलेली वर्दळ पाहता, अवघ्या काही वेळातच संपूर्ण रस्त्यावरील ट्रॅफिक जाम झाली. त्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या नवीन प्रयोगाने वाहतूक सुरुळीत होण्याऐवजी अनेक जटिल प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून अवघ्या काही वेळातच वाहतूक विभागाने आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा ‘जैसे थे’ वाहतूक सुरू केली.
दरम्यान, शहर बस वाहतूक सुरुळीत होण्यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला असून, दुहेरी वाहतूक सुरू करून काय अडचणी येतात त्याचा अभ्यास केला जात आहे. दोन दिवसांनंतर या रस्त्यावरील वाहतूक वळविण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Dual road effort was resolved in some time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.