राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांनी जाणून घेतल्या डुबेरेकरांच्या सोयीसुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:13 PM2019-12-29T22:13:39+5:302019-12-29T22:14:51+5:30
आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.
सिन्नर : आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे भेट देऊन सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.
केंद्र शासन १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीस भरघोस निधी देते. तसेच ग्रामविकासासाठी विविध विभागांकडून अनुदान देण्यात येत आहे. केंद्र सरकार ग्रामस्तरावर २९ विभागांकडून शेतकरी, महिला, बालक, माता, ग्रामस्थ, वंचित,
अपंग यांच्याकरिता अनुदान अदा करते. यात प्रामुख्याने कृषी विभागाकडून पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, जमीन आरोग्यपत्रिका, मागेल त्याला शेततळे, सूक्ष्म सिंचन, पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाटप, विविध रोगांचे लसीकरण, वनविभागाकडून बांधावर वृक्षलागवड, अनुदानित गॅस वाटप, सुकन्या वृक्षलागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाच्या प्रधानमंत्री मातृवंदना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जननी सुरक्षा, बालवाढीचा निष्कर्ष, अंत्योदय अभियानाअंतर्गत सर्वेक्षण, महिला बचतगटाच्या सशक्तीकरण योजना आदी योजना येतात.
लाभार्थींशी थेट संवाद
या सर्व योजनचे ग्रामस्तरावरील सद्य:स्थिती जाणून घेणे, लाभार्थींना योग्य लाभ योग्य कालावधीत मिळणे, योजनांची कार्यक्षमता तपासणे, कर्मचारी आणि लाभार्थींशी थेट संपर्कसाधणे हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. त्यांनी लाभार्थींशी थेट संवाद साधून योजनेच्या लाभाविषयी माहिती जाणून घेतली.