खड्यात पडून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 07:23 PM2018-12-18T19:23:26+5:302018-12-18T19:24:27+5:30
भाऊसाहेबनगर : भाऊसाहेबनगर ते कसबेसुकेणे येथे जाणारा रस्ता अतिशय खराब आणि खड्यांचा झालेला असुन या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. शुक्र वारी (दि.१४) सायंकाळी विजय सोनवणे हे दुचाकीवरून खड्यात पडुन जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी (दि.१८) त्यांचे निधन झाले.

क. का. वाघ विद्याभवनचे कर्मचारी विजय रंगनाथ सोनवणे (५७) हे शुक्र वारी सायंकाळी कामावरून भाऊसाहेबनगर ते कसबेसुकेणे रस्त्यानोा घरी जात असताना खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडले. त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी नाशिकला दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
त्यांचेवर सुकेणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान काही दिवसापूर्वी याच संस्थेचे कर्मचारी व सोनवणे यांचे मित्र संदिप बागुल हे देखिल या खड्यामुळे दुचाकीवरून पडुन गंभीर जखमी झाले होते.
सदर मार्गावरील खड्यांमुळे येथे सतत अपघात होत असतात. संबंधित विभागाच्या दुर्लक्ष्यांमुळे सोनवणे यांचा नाहक बळी गेल्याची भावना गावात व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची किमान डागडुजी व्हावी अशी मागणी केली जात आहे.
मयत सोनवणे यांचे पश्चात दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार असुन मुलीचे लग्न जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात त्यांचा प्रवास वाढल्याने त्यांचे अपघाती निधन झाले.