दुडगावच्या द्राक्ष बागायतदाराला १३ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:03+5:302021-07-10T04:11:03+5:30
त्र्यंबकेश्वर : दुडगाव येथील द्राक्ष बागायतदार त्र्यंबक वामन कडलग यांना व्यापाऱ्याने १३ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर ...
त्र्यंबकेश्वर : दुडगाव येथील द्राक्ष बागायतदार त्र्यंबक वामन कडलग यांना व्यापाऱ्याने १३ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ लाख ९४ हजार ९२६ रुपयांचा धनादेश न वटल्याने हा प्रकार उघडकीस झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्राक्षाचा व्यवहार द्राक्ष बागायतदार त्र्यंबक वामन कडलग (रा.आनंदवली, गंगापूर रोड) यांच्या शेतात २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२१ च्या दरम्यान झाला. एकूण २६ टन द्राक्ष ४७ व ४९ किलो प्रमाणे व्यवहार करण्यात आला. यातील काही रक्कम रोख देण्यात आली. तर उर्वरित १२ लाख ९४ हजार ९२६ रूपयांचा धनादेश देऊन द्राक्ष मालकाचा विश्वास संपादन करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले तरी आज देतो उद्या देतो असे करुन द्राक्षाची रक्कम अद्यापपावेतो दिलीच नाही. यास्तव संशयित अमित अरुण देशमुख रा.शाजापूर मध्य प्रदेश, भूषण दिलीप पवार, धुळे, विशाल मारुती विभुते, धुळे, अमोल अविनाश चव्हाण, कोथरुड पुणे, सागर गजानन जगताप, बारामती, संतोष तुकाराम बोराडे, थेरगाव ता.निफाड, प्रशांत ज्ञानदेव भोसले, घोरपडी, पुणे , दीपक ज्ञानदेवराव भोसले, पुणे अशा आठ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डफळे करीत आहेत.
----------------