जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:10 AM2018-03-23T00:10:58+5:302018-03-23T00:10:58+5:30
नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला.
नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला असून, सुमारे २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने २७ हजाराहून अधिक हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले होते.
विदर्भात बोंडअळीने कापसाचे पीक नष्ट करण्यास सुरुवात केल्याने त्यावर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकºयांचा विषबाधेने बळी जाण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर काही दिवसांतच बोंडअळीने नाशिक जिल्ह्यातील कापसावरही आपले बस्तान बसविले व कापूस पिकाची पाने खाण्यास सुरुवात केल्याने त्याचा परिणाम कापसाच्या फुलावर झाला. नाशिक जिल्ह्यात साधारणत: मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात सर्वत्र कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तथापि, शासनाचा आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करेपर्यंत बोंडअळीमुळे अन्य पिकांवर तसेच जमिनीची पोत बिघडू नये म्हणून तत्पूर्वीच काही शेतकºयांनी कापसाचे पीक उपटून नष्ट केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कापसाचे पंचनामे करण्याच्या विषयावरून वादही झडले.