माळरानावर फुलली शेती, पाणीप्रश्न मिटला

By admin | Published: October 15, 2016 01:49 AM2016-10-15T01:49:33+5:302016-10-15T01:50:00+5:30

सटाने : ३५० एकर सिंचन; सात दशलक्ष घनमीटर हक्काचे पाणी

Due to abundance of crops, water disputes have disappeared | माळरानावर फुलली शेती, पाणीप्रश्न मिटला

माळरानावर फुलली शेती, पाणीप्रश्न मिटला

Next

नाशिक : गेल्या वर्षाची गोष्ट. पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलेला, नदी कोरडीठाक पडलेली, विहिरींनीही तळ गाठलेला. थंडीच्या सुरुवातीलाच दीड हजार लोकसंख्येच्या सटाने गावाला पाणीटंचाईने वेढलेले. अस्मानी संकटापुढे संपूर्ण गावापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला. अशावेळी पाण्यासाठी शासन दरबारी टॅँकरसाठी प्रयत्न सुरू झाले. एकदाचा टॅँकर मंजूर झाला, पण त्याचे पाणी किती व कोणाला पुरणार? मग आठवण झाली १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची.
गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला. तलावातील गाळाने माळरान तर फुलविलेच, पण सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ग्रामस्थांची तहान कायमची भागवली.

Web Title: Due to abundance of crops, water disputes have disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.