मालेगावी ३७ ठिकाणी महागठबंधनची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:12 AM2018-08-19T00:12:55+5:302018-08-19T00:13:30+5:30
शहरातील वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री उरकण्यात आलेल्या कामांची मनपा प्रशासनासह आर्थिक गुन्हे शाखाद्वारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज महागठबंधन आघाडीच्या वतीने मालेगावी ३७ चौकात प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
आझादनगर : शहरातील वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री उरकण्यात आलेल्या कामांची मनपा प्रशासनासह आर्थिक गुन्हे शाखाद्वारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज महागठबंधन आघाडीच्या वतीने मालेगावी ३७ चौकात प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
शहरातील मनपाच्या वॉर्ड क्रमांक २० मध्ये प्रत्यक्ष जागेवर कामे न करता मनपास देयके सादर करण्यात आल्याचा आरोप महागठबंधनद्वारे केला जात आहे. संपूर्ण ३७ ठिकाणांची चौकशी करीत कामे झालीच नसल्याचे पुरावे असल्याचा दावा आघाडीतर्फे बुलंद एकबाल, मुस्तकीन डिग्निटी व माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महागठबंधन आघाडीतर्फे ‘विकास की तलाश’ नावाने फेरी काढण्यात आली होती.