हवामान बदलामुळे द्राक्षबागा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:15 AM2018-12-28T01:15:34+5:302018-12-28T01:16:01+5:30
नाशिक : द्राक्षपंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्णातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या दोन-तीन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५.७ अंशांपर्यंत घसरल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला असून, सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर भुरी, करपा, डावनी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत.

संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना गुरुवारी (दि.२९) नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचा धोका वाढला असून, अपेक्षित साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतकºयांकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे.
- डॉ. एस. डी. सावंत,
द्राक्ष उत्पादन मार्गदर्शक, पुणे